बंगळुरू – बंगळुरू शहरातील मंदिरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मंदिरामधील दानपेटीत एक व्यक्ती वापरलेले कंडोम टाकत असे. या व्यक्तीला आता कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. देवदास देसाई असं आरोपीचं नाव आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,’आरोपी देवदास देसाई गेल्या वर्षभरापासून शहरातील मंदिरांच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकत असे. 62 वर्षीय आरोपी देवदास देसाईने शहरातील मंदिर , गुरुद्वारा आणि मशिदींमध्ये हे कृत्य केले.
जेव्हा ही घटना उघड झाली त्यावेळी पोलिसांना त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र,आरोपी देवदास देसाई पण प्रत्येक वेळी पळून जाण्यात यशस्वी व्हायचा. यातच कोरजना कट्टे गावातील एका मंदिराच्या दानपेटीत वापरलेला कंडोम मिळाल्याची चर्चा होती. यावेळी त्या मंदिरातील सिसिटीव्ही फुटेजचा तपास घेत पोलिसांनी त्याला अटक केली.
दरम्यान, आरोपी देवदास देसाई याने चौकशीदरम्यान पोलिसांना हे कृत्य करण्यामागचे कारण सांगत हा गुन्हा कबुल केला आहे. तो म्हणाला,’ मी फक्त येशूचा संदेश पसरवत होतो. बायबलमध्ये येशूशिवाय दुसरा देव नाही असे म्हटले आहे. मी कंडोम फेकत असे कारण अशुद्ध वस्तू फक्त अशुद्ध ठिकाणीच टाकल्या पाहिजेत. मी असे करत होतो कारण त्या ठिकाणी विटंबना करून मी लोकांना त्याच्या धर्माकडे वळवू शकेल.’ असेही तो म्हणाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक लोक संतापले आहेत.