मेहक कपूरची उपांत्यपूर्व फेरीत धडक

पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धा

पुणे – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलींच्या गटात मेहक कपुर हिने तिसऱ्या मानांकित सिध्दी खोतचा, तर 12 वर्षांखालील मुलींच्या गटात अविपशा देहुरी हिने संघर्षपूर्ण सामन्यात प्राची एस. हिचा 6-5(5) असा टायब्रेकमध्ये पराभव करत आगेकूच केली.

मेट्रोसिटी स्पोर्टस अँड हेल्थ क्‍लब, कोथरूड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत 14 वर्षांखालील मुलींच्या गटात बिगर मानांकीत मेहक कपुरने तिसऱ्या मानांकीत सिध्दी खोतचा 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकीत कौशिकी समंथाने दुर्गा बिराजदारचा 6-1 असा पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.
12 वर्षांखालील मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत चौदाव्या मानांकीत श्रावणी देशमुखने चौथ्या मानांकीत रिषीता मोरेचा 6-5(3) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकीत काव्या देशमुख हिने केया तेलंगचा 6-0 असा सहज पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

14 वर्षांखालील मुली (उप-उपांत्यपूर्व फेरी) : मेहक कपुर वि.वि सिध्दी खोत (3) 6-2; कौशिकी समंथा(1) वि.वि.दुर्गा बिराजदार 6-1; अलिना शेख वि.वि.सानिका लुकतुके 6-1; श्रुती नानजकर(4) वि.वि.राजलक्ष्मी देसाई 6-2; सिमरन छेत्री (8) वि.वि काव्या कृष्णन (6) 6-4; मयुखी सेनगुप्ता (7) वि.वि अनिका शहा 6-1; समृध्दी भोसले (5) वि.वि श्रावणी पत्की 6-4. 12 वर्षांखालील मुली (दुसरी फेरी) ः श्रावणी देशमुख (14) वि.वि रिषीता मोरे (4) 6-5(3); काव्या देशमुख (1) वि.वि केया तेलंग 6-0;अनन्या देशमुख वि.वि काव्या पत्की 6-1; अविपशा देहुरी वि.वि प्राची एस 6-5(5); प्रेक्षा प्रांजल(8) वि.वि अनुवा कौर 6-0.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.