हिंसाचारामुळे पाकिस्तानातील सोशल मीडिया सेवेवर तात्पुरती बंदी

इस्लामाबाद  – पाकिस्तानातील तेहरिक-ई-लबाईक पाकिस्तान या इस्लामिक कट्टरपंथीय संघटनेकडून गेले तीन दिवस देशाच्या विविध भागात हिंसक निदर्शने सुरू असल्याने तेथील सरकारने ट्‌विटर, फेसबुक आणि व्हॉट्‌सऍप या सोशल मीडियावर शुक्रवारी चार तासांची बंदी घालून या सेवा बंद केल्या होत्या.

फ्रान्समध्ये गेल्या वर्षी एक ईश्‍वर निंदा करणारे कार्टुन प्रसारित करण्यात आल्याने पाकिस्तानातील फ्रान्सच्या दूताची हकालपट्टी करा, या मागणीसाठी या संघटनेने ही उग्र निदर्शने देशात सुरू केली आहेत. या प्रकरणात पाकिस्तान सरकारने संघटनेचा प्रमुख हुसेन रिझवी याला अटकही केली आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. हे कार्यकर्ते अनेक ठिकाणी सुरक्षा जवानांनाही भिडण्याचा प्रकार घडला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत सात जण ठार आणि तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर हिंसाचारात होणारी संभाव्य वाढ लक्षात घेऊन सोशल मीडियावर तात्पुरती बंदी घातली होती. तरीही हा हिंसाचार थांबला नाही तर सोशल मीडियावर कायमची बंदी घातली जाईल, असा इशारा पाकिस्तानच्या दूरसंचार प्राधिकरणाने दिला आहे. तेहरिक-ई-लबाईक या संघटनेने सोशल मीडियाचा वापर करून संघटितपणे हिंसाचार घडवला असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या संघटनेवर त्या अनुषंगाने पुढील कारवाई केली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.