वाघोली- कोरोनामुळे अनेक लहान-मोठे व व्यावसायिक गेल्या दीड वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जात असून या व्यावसायिकांना सवलती देऊन त्यांना आधार देण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
मागील वर्षी लॉकडाऊन च्या कालावधीत अनेक निर्बंध लादले गेले होते. त्यामुळे अनेक व्यवसायांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते. हीच परिस्थिती याहीवर्षी झालेल्या लॉक डाऊन मध्ये पण कायम आहे. त्यामुळे पुणे शहर आणि पुणे जिल्हा ग्रामीण मध्ये या लहान मोठ्या व्यावसायिकांना सरकारने अथवा त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेने योग्य ती मदत करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
“लहान मोठ्या व्यवसायिकांची बँकेची देणे त्यांना या काळात द्यावीच लागली आहेत यामध्ये व्याजदरात सवलत देणे गरजेचे होते. यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
– प्रदीप सातव पाटील (नागरिक)
“व्यावसायिकांच्या वेगवेगळ्या कर, तसेच विज बिल सवलतीबाबत शासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे.” – गणेश कुटे (कुटे कन्स्ट्रक्शन, पुणे)
“पुणे महानगरपालिका आणि ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या हॉटेल च्या बाबतीत वेगवेगळे कर आकारणी केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणाऱ्या हॉटेल संदर्भातील करांमध्ये सवलत मिळावी.” – संतोष सातव पाटील (हँग आऊट हॉटेल मालक, वाघोली)