भारतीय संघाकडून ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ सामन्यात मिल्खा सिंग यांना अनोखी श्रद्धांजली

लंडन : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचं शुक्रवारी निधन झालं. मिल्खा सिंग यांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलकडून सांगण्यात आले होतं. मात्र त्यांची करोनाविरुद्धची झुंज संपुष्टात आली. देशभरात त्यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात येत आहे. पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर आज सामन्याला सुरुवात झाली. या सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय क्रिकेट संघाने फ्लाईंग सिख नावाने प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. ज्यामुळे भारताला फलंदाजीसाठी उतरावे लागले असून भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले आहेत. दरम्यान भारतीय संघाने महान धावपटू मिल्खा सिंग यांना अनोख्याप्रकारे श्रद्धांजली वाहिली आहे. भारताच्या सर्व खेळाडूंनी हाताला काळ्या फिती बांधून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.


दरम्यान सलामीसाठी उतरेलेले रोहित आणि शुभमन यांच्या हाताला काळ्या फिती देखील दिसून आल्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.