मोदींची ऑफर शरद पवारांनी नाकारली म्हणाले,’अशा लोकांसोबत…’

Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीनंतर देशातील बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेससोबत जातील, असे भाकित शरद पवार यांनी व्यक्त केल्यानंतर देशात पुन्हा एकदा विलीनीकरण या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची अर्धी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे भाकित केले होते. यावरून राजकारण तापले असून राजकीय नेते प्रतिक्रिया देतांना दिसत आहे.
यावरच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुबार येथे सभेला संबोधतांना शरद पवार यांना मोदी ऑफर दिली. मोदी म्हणाले होते की,’बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत आहेत. नकली शिवसेना, NCP ने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच मन बनवलय’ असेही ते म्हणाले. त्यांनी दिलेल्या ऑफरवर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले,’ज्या व्यक्तीचा, पक्षाचा आणि त्यांच्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही. अशा लोकांसोबत असोसिएशन होणार नाही… व्यक्तीगत संबंधाचं सोडा… पण राजकीय संबंध प्रस्थापित करणं हे माझ्याच्यानं कधी होणार नाही. असेही ते म्हणाले आहे.
हे वाचाल का ? मोदींची ऑफर शरद पवारांनी नाकारली म्हणाले,’अशा लोकांसोबत…’





