पुणे – लायन्स क्लब ऑफ पुणे लोटस तर्फे भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पुणे येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त महाविद्यालयातील उपप्राचार्य जाधव सर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल “आदर्श शिक्षक” हा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्राचार्य डॉ. कदम एच.एम. , प्रा यादव बी. व्ही., प्रा शिंदे आर. डी., प्रा कुंभार ए.आर. , प्रा. श्रोत्री एस. एन., देशमुख एन.जे., प्रा.प्रविण जावळे , प्रा. पराग कदम यांचा देखील शिक्षक दिनानिमित्त यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष/लायन्स क्लबचे सह सचिव प्रसन्न पाटील यांनी केले. भारती विद्यापीठाने डॉ. शिवाजीराव कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी संबंधी एक चळवळ देश भरामध्ये सुरू केली. त्यामुळेच हे महाविद्यालय जगाच्या पातळी वरील नामांकित महाविद्यालय झाले. आजही या महाविद्यालयाने हीच गुणवत्तेची परंपरा डॉ.विश्वजित कदम, राज्य मंत्री ,महाराष्ट्र राज्य, कार्यवाह, भारती विद्यापीठ व प्राचार्य डॉ. एच.एम.कदम सर यांच्या मार्गर्शनाखाली निरंतर चालू असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी श्री प्रसन्न पाटील यांनी काढले.
विशेष सत्कारमूर्ती महाविद्यालयाचे उपप्राचार्य पोपट जाधव सर यांनी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे शैक्षणिक योगदान, औषध शास्त्र संबंधी शिक्षकांची जबाबदारी, शिक्षक म्हणून असणारी सामजिक बांधिलकी व विद्यार्थ्यांप्रती असणारी समर्पित जबाबदारी यावर आपले विस्तृत मनोगत व्यक्त केले.
लायन्स क्लब ऑफ पुणे लोटसचे लाला भुरट व अध्यक्ष रामेश्वर लाहोटी यांनी शिक्षक दिन विशेष व लायन्स क्लबची भूमिका यासंबंधी विचार मांडले. कार्यक्रम सूत्रसंचालन प्रा. प्रविण जावळे यांनी केले. याप्रसंगी लायन किरीट भाई शाह व लायन ललित शाह देखील आवर्जून उपस्थित होते.लायन्स क्लब ऑफ पुणे लोटस यांनी सदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल महाविद्यालया तर्फे त्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.