क्रिकेटचा महाराजा सौरव गांगुलीवरील बायोपिकची अखेर घोषणा! ‘हा’ अभिनेता साकारणार ‘दादा’चे पात्र?

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर बायोपिक बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे.  सौरव गांगुलीच्या बायोपिकबद्दल गेल्या तीन वर्षांपासून चर्चा सुरू आहे आणि अनेक मोठ्या चित्रपट कंपन्यांचे मालक सौरवला वारंवार भेटले आहेत. पण बायोपिक बनवण्याची जबाबदारी अखेर चित्रपट निर्माते लव रंजनच्या यांच्यावर सोपविण्यात आली.  

त्यांची कंपनी लव्ह फिल्म्सने भारतीय क्रिकेटच्या या स्टारवर बायोपिक बनवण्याची घोषणा केली आहे. या सिनेमात गांगुलीची भूमिका कोण करेल हे अद्याप जाहीर झालेलं नाही. पण गांगुलीनं स्वत: एका मुलाखतीमध्ये रणबीर कपूर यासाठी योग्य असल्याचं सांगितलं होतं. 

याआधी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार असलेले महेंद्रसिंग धोनी आणि अझरुद्दीन या खेळाडूंवरही बायोपिक्स बनवण्यात आले आहेत.

महेंद्रसिंग धोनी जेव्हा भारतीय क्रिकेट संघात चमकत  होते, तेव्हाच्या काळात जुने खेळाडू आणि तरुण खेळाडूंमधून विस्तव जात नसे. गंमत म्हणजे त्याच जुन्या खेळाडूंपैकी एक, सौरव गांगुलीला नंतर भारतीय क्रिकेट बोर्ड चालवण्याची जबाबदारी मिळाली. 

सद्यस्थितीत महेंद्रसिंग धोनीचा सूर्य भारतीय क्रिकेटमध्ये मावळला आहे आणि त्याला बीसीसीआयने पुढील टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचे मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे.

सौरव गांगुलीचा बायोपिक हा त्यांच्या क्रिकेट जीवनाचा एक भाग असणार की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष असणार याबाबत फिल्म स्टुडिओने अद्याप स्पष्टपणे सांगितले नाही, मात्र सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा होताच मुंबई चित्रपट जगतात खळबळ उडाली आहे.  

कंपनीने याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘दादा सौरव गांगुलीच्या बायोपिकची निर्मिती लव फिल्म्स करणार असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे.  ही जबाबदारी दिल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आणि एका महान कलाकृतीची अपेक्षा आहे.’

लव फिल्म्स ही फिल्ममेकर लव रंजन यांची कंपनी आहे.  सौरवच्या या बायोपिकमध्ये लवसोबत अंकुर गर्ग भागीदार आहे.  लव फिल्म्सने यापूर्वी ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘दे दे प्यार दे’, ‘मलंग’ आणि ‘छलांग’ सारखे चित्रपट केले आहेत. विशाल भारद्वाजचा मुलगा आकाशचा पहिला चित्रपट ‘कुत्ते’ देखील लव रंजन बनवणार आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत बायोपिक्सची चलती आहे.  याआधीही दिग्दर्शक नीरज पांडेने एमएस धोनीवर सुशांत सिंह राजपूतसोबत बायोपिक बनवला होता, पण क्रिकेट आणि सिनेमाचे चाहते त्याला बायोपिकपेक्षा धोनीचा पीआर चित्रपट मानतात. कारण चित्रपटात धोनीशी संबंधित कोणत्याही वादाचा उल्लेख नाही. 

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी यशस्वी ठरला. एकता कपूरने अझरुद्दीनसोबत इमरान हाश्मी अभिनीत ‘अझर’ नावाचा बायोपिक बनवला जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.   

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.