पुणे -पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांत आजपर्यंत 5 लाख 33 हजार 160 करोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात रुग्णांची संख्या 5 लाख 58 हजार 540 झाली आहे. तर, ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 9 हजार 856 इतकी आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.46 टक्के आहे.
पुणे जिल्ह्यातील करोनाबाधित एकूण 3 लाख 59 हजार 90 रुग्णांपैकी 3 लाख 42 हजार 708 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण 7 हजार 730 आहे. करोनाबाधित एकूण 8 हजार 652 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे, तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.44 टक्के आहे.