परिंचे- वीर (ता.पुरंदर) येथील तनिष्का वाघ हिने बॅंकॉक येथे झालेल्या नृत्य स्पर्धेत सोलो व डुएट प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला आहे. थायलंडची राजधानी बॅंकॉक येथे इंटरनॅशनल नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वीर येथील तनिष्का वाघ (वय 11) हिने पारितोषिक पटकावले आहे. डुएट डान्समध्ये तनिष्काचा पार्टनर म्हणून विदान खोत हा होता. या स्पर्धेत मार्गम डान्स अकॅडेमी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांजल भापकर, राधिका आव्हाड, तनिष्का वाघ व विधान खोत हे स्पर्धक सहभागी झाले होते. राधिका आव्हाड द्वितीय क्रमांक सोलो डान्स व प्रांजल भापकर प्रथम क्रमांक सोलो डान्स मध्ये मिळाला तर प्रांजल व राधिका यांच्या डुएट डान्सला बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड देण्यात आले. विधान खोत याच्या सोलो डान्सला द्वितीय क्रमांक मिळाला.
तनिष्का वाघ हिने आतापर्यंत 10 नॅशनल स्पर्धेत सहभाग 1 इंटरनॅशनल स्पर्धेत विविध पारितोषिके जिंकली आहेत. सिझन मॉल हडपसर येथेही तनिष्काला पब्लिक फेवर अवॉर्ड मिळाला आहे. वयाच्या 5 व्या वर्षांपासून तनिष्का नृत्याची आवड जोपासत आहे. भरतनाट्यमचे शिक्षण ती मार्गम डान्स अकॅडेमि येथे शिल्पा दानवे तुरिले यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहे. संकेत ससाणे हे तिचे मार्गदर्शक आहेत. थायलंड येथील स्पर्धेसाठी अतुल भोईर व संकेत ससाणे यांनी खूप मेहनत घेऊन कोरिओग्राफी केली. थायलंड येथील स्पर्धेनंतर अनेकांनी त्यांचे शुभेच्छा देऊन कौतुकही केले आहे.