‘तानाजी’ चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात; संभाजी ब्रिगेडनं पाठवलं पत्र

मुंबई – ‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच “तानाजी मालुसरे”. तानाजींच्या पराक्रमाची कथा आता चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

नुकतंच ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. या ट्रेलरमध्ये ‘स्वराज्यापेक्षा जास्त प्रिय महाराजांसाठी काहिच नसल्याचं दाखवण्यात आलं आहे’

दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांमुळे आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ट्रेलरमधील काही दृश्यांवर आणि संवादांवर ‘संभाजी ब्रिगेड’नं खुलासा मागितला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला आणि निर्मात्यांना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून आक्षेपार्ह प्रसंगांवर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे

1 Comment
  1. प्रणव says

    हा वाद उकरून काढणारे लोक विनाकारण जातीयता वाढवत आहेत. शिवाजी महाराज गोब्राम्हणप्रतिपालक होते या बद्दल खुलासा करायची काहीच गरज नाही. समर्थ रामदासस्वामींचा एकेरी उल्लेख करून केलेला अपमान सहन केला जाणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.