चेन्नई (तामिळनाडू) | येथील निवडणूक निकालातील सुरुवातीच्या कलांनुसार द्रमुक आघाडीवर असल्यानं कार्यकर्ते आणि समर्थक यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. द्रमुक पक्षाच्या मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून विजयोत्सवास सुरूवात झाली आहे.
सध्या, तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्ष 118 तर अण्णा द्रमुक 80 जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय.