व्हाट्स स्टेटस डाउनलोड कसे करायचे डाउनलोड?

व्हॉट्‌सऍपचे “स्टेटस’ हे एक लोकप्रिय फीचर आहे. या फिचरद्वारे वापरकर्ते व्हॉट्‌सऍपवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात, जे 24 तासांनंतर आपोआप अदृश्‍य होतात. अनेकवेळा काही सुंदर संदेश देणारे व्हिडिओ डाउनलोड करण्याची आपल्याला इच्छा होते, मात्र व्हॉट्‌सऍपने स्टेटस डाउनलोड करण्यास परवानगी देणारी कोणतीही सुविधा अद्याप सुरू केलेली नाही. आज आपल्याला एक ट्रिक सांगत आहोत ज्याद्वारे आपण कोणत्याही वापरकर्त्याचे व्हॉट्‌सऍप स्टेटस सहज डाउनलोड करू शकाल.

कोणत्याही वापरकर्त्याचे स्टेटस डाउनलोड करण्याचे दोन मार्ग आहेत. प्रथम आपल्या फोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डर वापरणे, दुसरा मार्ग म्हणजे प्रथम गूगल प्ले स्टोअरवरून आपल्या फोनमध्ये “स्टेटस डाउनलोडर फॉर व्हॉट्‌सऍप’ किंवा “व्हॉट्‌सऍप स्टेटस सेव्हर’ऍप डाउनलोड करणे.

एकदा डाउनलोड केले की आपल्याला हे ऍप उघडावे लागेल. येथे आपल्याला चॅट करण्यासाठी क्‍लिक आणि स्टेटस डाउनलोडर पर्याय दिसेल. या दोन पर्यायांपैकी आपणास स्टेटस डाउनलोडरचा पर्याय निवडावा लागेल. येथे आपण सर्व वापरकर्त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पहाल, जे त्यांनी त्यांच्या व्हॉट्‌सऍपवर स्टेटस म्हणून शेअर केले. नंतर आपण डाउनलोड करू इच्छित असलेल्या कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओवर क्‍लिक करा. यानंतर, आपल्याला डाउनलोड बटणावर टॅप करावे लागेल. स्टेटसवरून डाउनलोड केलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ फाइल मॅनेजरच्या स्टेटस डाउनलोडर फोल्डरमध्ये संग्रहित केले जातील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.