तामिळनाडूत भाजपला ठेंगा, द्रमुकची सरशी

चेन्नई – हिंदी भाषिक पट्टयामध्ये जोरदार मुसंडी मारणाऱ्या भारतीय जनता पार्टीला तामिळनाडूमध्ये मोदींचा करिष्मा दाखवता आलेला नाही. माजी मुख्यमंत्री आणि अद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर अद्रमुक पक्षाचीही स्थिती पूर्वीसारखी भक्कम राहिलेली नाही, हे यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले. तामिळनाडूमध्ये असलेल्या लोकसभेच्या 39 जागांपैकी द्रमुकने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या आहेत. कॉंग्रेसला 8 तर अद्रमुकला 2 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपला मात्र तामिळनाडूमध्ये खातेही उघडता आलेले नाही.

द्रमुकसाठी हा विजय म्हणजे मोठा “कमबॅक’ असल्याचे मानले जात आहे. 37 खासदारांसह तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून असलेल्या अद्रमुकची मात्र “सिंगल डिजीट’ संख्येपर्यंत पीछेहाट झाली आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या द्रमुकने अद्रमुकची ही अवस्था केली आहे. द्रमुकबरोबर आघाडी केल्याचा फायदा कॉंग्रेसलाही होणार आहे.

अद्रमुकने या निवडणुकीमध्ये 20 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ दोनच जागांवर विजय मिळण्याचे संकेत.”एक्‍झिट पोल’मधून मिळाले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.