मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी शनिवारी शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी न्या. उपाध्याय हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. मुख्य न्यायाधीश आरडी धानुका हे 30 मे रोजी निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर न्या. नितीन जामदार यांची हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.