प्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाविषयी सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काल प्रदर्शित झाला असून हा चित्रपटात आगळ्या अशा कथेवर बेतलेला, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळत आहे.
यातच मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटास ‘बाबा’ चित्रपट गोल्डन ग्लोब्ज २०२० मध्ये दाखवला जाणार आहे. परदेशी भाषा पुरस्कार विभागामध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, ‘अडगुलं मडगुलं’ या गाण्यालाही रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि इतर भाषेतील चित्रपटसृष्टींमध्येही चित्रपटाचा बोलबाला आहे.