पुणे – पिस्तूल आणि कोयत्यासह परिसरात दहशत पसरविणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. एप्रिल पासून त्याला पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, तरीही तो शनिनगर परिसरात आल्यानंतर शस्त्रासह अटक करण्यात आली. पप्पू उर्फ प्रवीण अनंता येणपुरे ( रा. आंबेगाव खुर्द ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनिनगरमध्ये हातात कोयता घेउन दुकानदारांना एकजण धमकावित असल्याची माहिती पोलीस अमंलदार सर्फराज देशमुख आणि अभिजीत जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाउन तडीपार पप्पू उर्फ प्रवीणला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि काडतुस मिळून आले. त्याच्यावर तडीपारीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिांदे, रवींद्र भोसले, अण्णासाहेब माडीवाले, संतोष भापकर, सोमनाथ सुतार, गणेश सुतार, सर्पैराज देशमुख, समीर बागसिराज, सचिन पवार, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.