किरकोळ महागाईचा टक्‍का घसरला; भाजीपाला स्वस्त झाल्याचा परिणाम

नवी दिल्ली – जानेवारी महिन्यातील किरकरोळ दरावरील महागाईची आकडेवारी आज सरकारने जाहीर केली. त्यानुसार जानेवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर कमी होऊन तो 4.06 टक्‍के इतका झाला आहे.

या महिन्यात भाजीपाल्याचे दर कमी झाल्यामुळे हा महागाई दर कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4.59 टक्‍के इतका होता. भाजीपाल्याबरोबर इतर अन्न धान्याचे दर वेगाने कमी हाते आहेत.

या वर्षी कृषी उत्पादन भरपूर झाले आहे. मात्र अगोदर वाहतूक सुरळीत नव्हती. त्यामुळे अन्नधान्याचे आणि भाजीपाल्याचे दर जास्त होते. आता वाहतूक परिस्थिती सुधारू लागली आहे. रिझर्व्ह बॅंक व्याजदर ठरवितांना किरकोळ महागाईचा दर विचारात घेत असते.

बॅंकेने हा दर 4 टक्‍क्‍याच्या आता रोखायचे ठरविले आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून हा दर 4 टक्‍क्‍येपेक्षा जास्त आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅकेने आपले व्याजदर आहे त्या पातळीवर स्थिर ठेवले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.