पूनम आणि शिखाची गोलंदाजीत चमकदार कामगिरी
सिडनी : पूनम यादव आणि शिखा पांडे यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत यजमान आॅस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली आहे. फिरकीपटू पूनम यादव सामन्याची मानकरी ठरली.
#TeamIndia begin the #T20WorldCup campaign with a win over Australia 🇮🇳💪 #AUSvIND pic.twitter.com/JKcPaGUibf
— BCCI Women (@BCCIWomen) February 21, 2020
भारतीय महिला संघाने विजयासाठी दिलेल्या १३३ धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजीसमोर आॅस्ट्रेलिया महिला संघाचा डाव १९.५ षटकात ११५ वर संपुष्टात आला. आॅस्ट्रेलियाकडून एलिसा हीलीने ५१(३५) आणि एश्ले गार्डनर हिने ३४(३६) धावांची खेळी केली पण संघास विजय मिळवून देण्यास त्या अपयशी ठरल्या. या दोघींशिवाय आॅस्ट्रेलियाच्या एकाही महिला फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
A game-changing spell by @poonam_yadav24 turned this contest on its head.
The best figures by an overseas spinner in a women's T20I played in Australia!#T20WorldCup | #AUSvIND | #TeamIndia pic.twitter.com/kuPVFFGwXQ
— T20 World Cup (@T20WorldCup) February 21, 2020
भारतीय गोलंदाजीत पूनम यादवने ४ षटकांत १९ धावा देत सर्वाधिक ४ तर शिखा पांडेने ३.५ षटकात १४ धावा देत ३ विकेट घेत संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. राजेश्वरी गायकवाड हिने ४ षटकात ३१ धावा देत १ विकेट घेतली. तर, जेमिमा राॅड्रिग्स हिने आॅस्ट्रेलियाचे दोन फलंदाज धावबाद केले.
In the #T20WorldCup opener, #TeamIndia have set a total of 132-4 on the board. 💪
Time for the bowlers to defend the target. #AUSvINDFollow it live 👉👉 https://t.co/2nh7zowHqX pic.twitter.com/Y71nDgcC5B
— BCCI Women (@BCCIWomen) February 21, 2020
तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना करताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले होते. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने शफाली वर्माच्या १५ चेंडूत २९, जेमिमा राॅर्ड्रिगेजच्या २६(३३) आणि दीप्ती शर्माच्या नाबाद ४९(४६) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या.
याशिवाय सलामीवीर स्मृती मानधना हिने १०(११), हरमनप्रीत कौरने २(५) आणि वेदाने नाबाद ९(११) धावांची खेळी केली.
आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत जेस जोनासेन हिने सर्वाधिक २ तर एलिसे पैरी आणि डेलिसा किमिंसे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.