मुंबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा पुढील महिन्यात होत असून त्यासाठी मैदानात उपस्थित राहून सामने पाहण्याची परवानगी अमिराती व ओमान सरकारने दिली आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धा 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दुबईत होणार आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी तिकिटांची विक्री सुरू केली आहे.
सर्वात कमी रकमेचे तिकीट 600 रुपयात उपलब्ध आहे. मात्र, भारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी एका तिकिटासाठी लाखो रुपये देत आहेत. या सामन्यासाठी सर्वात महागडे तिकीट 2 लाख रुपये किमतीला विकले गेले आहे.
तिकिटे 12 हजार 500 पासून देखील उपलब्ध आहेत. 31 हजार 200 आणि 54 हजार 100 रुपयात प्रीमियम आणि प्लॅटिनम स्टॅंडचे तिकीट खरेदी करू शकतात. मात्र, या तिन्ही दरांची तिकिटे संपली आहेत.