पिंपरी, (प्रतिनिधी) – एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालयात “श्रीमती सुभद्रा भोसले ३ री राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सिम्बोयसीस विधी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले तर मॉडर्न विधी महाविद्यालयाने उप विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या गौरी नागवडे यांना बेस्ट ॲडव्होकेट तर के. एल. ई विधी महाविद्यालय, बेंगलोरला बेस्ट मेमोरियलने सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीश ए. आर. जोशी, अजिंक्य डी. वाय. पाटील विधी महाविधालयाचे डॉ. सनी थौमस, मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट शैलेश आगलावे, डॉ. गजेंद्र धमाल, डॉ. एश्वर्या कदम, नीता अहिर, विश्वास खराबे, मंगेश खराबे, क्रिस्टी बिरू, डॉ. सलीम शेख, प्राचार्य गणेश देशमाने, डॉ. प्रदीप तांबे यांनी जज्ज म्हणून काम पाहिले.
पारितोषिक वितरण समारंभामध्ये विजेत्यांना प्रमुख पाहुणे न्यायाधीश ए. आर. जोशी, डॉ. सनी थौमस, ॲड. शेलेन्द्र आगलावे, एस. ई. सोसायटीचे डॉ. डी. के. भोगले, प्राचार्य डॉ. राहीनी जगताप, उप- प्राचार्य कैलाश पोळ, प्राचार्य डॉ. प्रियांका अग्रहारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देण्यात आल्या. या स्पर्धेचे समन्वयक ॲड. अर्पिता गोस्वामी आणि मुट कोर्ट सोसायटीच्या सदस्यांनी काम पाहिले. या स्पर्धेस विविध महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी, माजी विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.