मुंबई – अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या हटके स्टाईल आणि अनोख्या फॅशनची प्रसिद्ध आहे. उर्फीओ कधी काय करेल याचा कोणीही नेम लावू शकत नाही. कधी ती फक्त दोन मोबाईलचा टॉप घालून येते तर कधी कॅसेटमधील काळ्या रिल्सपासून ड्रेस बनवते. उर्फीला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहायला फार आवडते. सध्या उर्फी अंडर आय क्रीमचा पर्दाफाश केल्याने चर्चेत आली आहे.
उर्फीने आपला एक फोटो इन्स्टा स्टोरीवरती ठेवला होता. ज्यामध्ये तिच्या डोळ्यांखाली मोठे खड्डे आणि काही खुणा झालेल्या दिसतात. यावेळी उर्फीने लिहिले घाबरू नका मला कोणी मारलेले नाही. काल मी या डागांना मेकपने लपवले मी आय फिलर्स केले त्यामुळे थोडी आग होत आहे. खर तर उर्फीने आपल्या या पोस्टद्वारे अंडर आय क्रीमचा पर्दाफाश केला आहे. ती म्हणते अशी कोणतीही क्रीम नाही ज्यामुळे तुमचे डार्क सर्कल पूर्णपणे जातील त्यामुळे अंडर आय क्रीम हा एक स्कॅम आहे असंही उर्फीने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
फिलर्स करणे हाच पर्याय चांगला असल्याचे उर्फी म्हणते. टीव्ही शोज व्यतिरिक्त उर्फी बिग बॉसमध्ये आल्यामुळे चांगली चर्चेत आली होती. तेव्हापासून सतत चर्चेत राहण्यासाठी उर्फी वारंवार कोणती ना कोणती अतरंगी फॅशन करत असते.