म्हसवड (प्रतिनिधी) – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार, महाशिवरात्रीला म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराच्या भुयारातील स्वयंभू शिवलिंग उद्या, दि. 11 रोजी रात्री दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक आदी राज्यांमधील भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या दहाव्या शतकातील हेमाडपंथी मंदिरातील भुयारात असलेले स्वयंभू शिवलिंग वर्षातून फक्त एकदा महाशिवरात्रीला भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येते.
परंतु यंदा करोनामुळे स्वयंभू शिवलिंग दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिराकडे फिरकू नये, असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.