भारताची पहिली मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हाएकदा मोठया पडद्यावर वापसी करण्यास सज्ज झाली आहे. सुष्मिताने नुकताच तिच्या आगामी “आर्या’ वेब सीरिजचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ही मालिका हॉटस्टारवर रिलीज होणार अहे. या सीरीजच्या फर्स्ट लूक टीझरमध्ये सुष्मिता खूपच ऍथलेटिक दिसत आहे आणि रोपवर चढताना दिसते. यातील सुष्मिता सेनच्या लुकमुळे चाहते खूपच प्रभावित झाले आहेत.
असे मानले जाते की या सिरिजमध्ये सुष्मिता क्राइम डिटेक्टिव्हची भूमिका साकारत आहे. सुष्मिताने अशा आव्हानात्मक भूमिका साकारण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी तिने “समय’ चित्रपटात एसीपी मालविका चौहानची भूमिका साकारली होती. चाहत्यांना आशा आहे की, सुष्मिता पुन्हा एकदा एका स्पेशल भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, सुष्मिताच्या या नवीन वेबसीरीजचे दिग्दर्शन राम माधवानी करत आहेत. माधवानी यांनी 2016मध्ये प्रदर्शित झालेल्या सोनम कपूरच्या “नीरजा’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.