नवी दिल्ली : मध्यमवर्गीयांची कथा आपल्या चित्रपटातून मांडणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों मे’, ‘एक रुका हुआ फैसला’ यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटांचे दिग्दर्शन बासू चटर्जी यांनी केले आहे.
Sad to hear the demise of Veteran Filmmaker Shri.Basu Chatterjee. Will be always remembered for his Light Hearted comedies & Simplistic Films. #OmShanti 💐🙏 pic.twitter.com/YllOjtP4U5
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) June 4, 2020
दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. दिग्दर्शक बासू चटर्जी यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठा धक्का बसला आहे. दुपारी २ वाजता सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. इंडस्ट्रीचे हे सर्वांत मोठे नुकसान आहे. तुमची खूप आठवण येईल, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीसुद्धा सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘हलकेफुलके विनोद आणि साधेपणा या चित्रपटांतील दोन वैशिष्ट्यांमुळे ते कायम लक्षात राहतील’, असे त्यांनी लिहिले.