मुंबई – माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या ललित मोदीसोबतच्या तिच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, सुष्मिता सेनने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मान्सून एन्जॉय करताना दिसत आहे. चाहते देखील तिच्या फोटोंवर जोरदार कमेंट करताना दिसत आहेत.
सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मुंबईतील सुंदर पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे. कधी ती तिच्या कारच्या बाहेर डोकावताना दिसते तर कधी तिचे केस नीट करताना दिसते. या फोटोंमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी चाहत्यांना मात्र तिच्या आनंदच कौतुक वाटतंय.
View this post on Instagram
फोटो शेअर करताना सुष्मिता सेनने कॅप्शन लिहिले- ‘या मुलीला पाऊस आवडतो. या मुलीला मुंबई खूप आवडते. गेल्या अनेक दिवसांपासून सुश्मिता मोठ्या पडद्यापासून लांब आहे. चाहत्यांनी मात्र हार्ट पोस्ट करत सुश्मिताच्या फोटोवर तुफान कमेंटबाजी केली आहे. अनेकांनी तिला सुंदर अशा कमेंट केल्या आहेत तर अनेकांनी यावेळी ललित मोदींबाबत प्रश्न विचारले आहेत.