बॉलिवूड ऍक्टर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या रहस्यावर आधारीत “न्याय: द जस्टीस’चा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूतचा रोल जुबेर करणार आहे. तर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या रोलमध्ये श्रेया ही ऍक्ट्रेस दिसणार आहे. सुशांतच्या वडिलांच्या रोलमध्ये अबिनेते असरानी असणार आहेत.
या वर्षी 11 जूनला सुशांतला श्रद्धांजली अर्पण करत हा सिनेमा रिलीज केला जाणर आहे. सुशांतचा मृत्यू कशाप्रकारे झाला, या मुद्द्याभोवतीच या सिनेमाची कथा फिरणार आहे. सिनेमामध्ये मात्र अभिनेता सुशांत सिंहचे नाव अभिनेता महिंदर सिंह असे दाखवले असणार आहे. या सिनेमाचा पोस्टर आणि टीझर आज रिलीज केला गेला आहे. सध्या याच विषयावरील “काय घडले त्या रात्री’ ही मराठी मालिका खूप गाजते आहे.