गुढीपाडवाच्या गोड आठवणी

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या गुढीपाडवा सणाच्या गोड आठवणींना उजाळा दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मी आणि माझ्या आईने महाराष्ट्रीय पेहराव, दागदागिन्यांचा साज चढवत गुढी उभारून महाराष्ट्रीय नववर्षाचे स्वागत केले. आमच्या गुढीला दरवर्षी हिरव्या रंगाची साडी बांधली जाते. अशा प्रकारे एक नव चैतन्याची, उत्साहाची गुढी उभारून आम्ही हा सण साजरा करतो. मी आणि आई साडीमध्ये फोटो काढण्याचा मनमुराद आनंद घेतो.

गुढीपाडव्याचा खरा आनंद, उत्साह, जल्लोश हा पुणे, गिरगावात असतो. गिरगावात माझे वडिलांचे बालपण गेले, आम्हीही अनेक वर्षे गिरगावात राहिलो. अस्सल मराठमोळ्या साड्या, दागदागिन्यांचा साजशृंगार परिधान केलेल्या तरुणी, मराठमोळे सदरा, लेहंगा परिधान केले तरुण या सणाची शान आणखी वाढवतात. याप्रमाणे पुण्यातही गुढीपाडव्याचा उत्साह काही औरचं असतो. एकामेकांना गोडधोड देत सणाचा आनंद आणखी वाढवला जातो.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.