नव्या घराच्या शोधात…

बी-टाऊनमध्ये अफेअर्स, ब्रेकअप, पुन्हा नवी रिलेशनशिप यांची सद्दी कायम असते. एखाद्याचे एखादीबरोबर ब्रेकअप झाले तरी काही काळानंतर त्याच्या आयुष्यात दुसरी कुणीतरी आलेली असते. सुशांतसिंह रजपूतचेच उदाहरण घ्या ना !


सुशांत आणि रिया चक्रवर्ती यांच्या अफेअरची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सर्वत्र ऐकायला मिळत आहे. मे 2019 मध्ये या दोघांच्या प्रेमप्रकरणाविषयी पहिल्यांदा बोललं जाऊ लागलं.

आता चर्चा आहे की ही जोडगोळी लिव्ह इनमध्ये राहणार आहे ! इतकेच नव्हे तर यासाठी हे प्रेमीयुगुल घराचा शोध घेत आहे.

 

View this post on Instagram

 

Tender surrender ?

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on


सुशांत आणि रियामध्ये चांगली मैत्री होती. दोघे एकमेकांना सहा वर्षांपासून ओळखतात. सारा अली खानशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत आणि रियाची मैत्री प्रेमात रुपांतरित झाली. 2017 पासून सुशांत मुंबईतील बांदरामध्ये असलेल्या कॅप्री हाईटस्‌ येथे राहात आहे.

 

View this post on Instagram

 

अपना ग़म ले के कहीं और न जाया जाये घर में बिखरी हुई चीज़ों को सजाया जाये जिन चिराग़ों को हवाओं का कोई ख़ौफ नहीं उन चिरागों को हवाओं से बचाया जाये ———————- बाग़ में जाने के आदाब हुआ करते हैं किसी तितली को न फूलों से उड़ाया जाये घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूं कर लें किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाये ~ निदा फ़ाज़ली Good morning ?❤️✊?? ☀️

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on


मात्र गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत रियासोबत तिच्याच घरी राहतोय म्हणे ! आता सुशांत आणि रिया दोघे एका नव्या घराच्या शोधात असून या दोघांन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे. आता इतकी जुनी मैत्री असूनही ही जोडगोळी विवाहबंधनात का अडकत नाहीये, कोणास ठाऊक ! कदाचित नव्या घरात गेल्यानंतर या नात्याचे रूपांतर विवाहात होईल अशी आशा करुया !

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.