#प्रभात_जनसंवाद : आता चर्चा नको तोडगा काढू

आपल्या भागातील समस्या, प्रश्‍न आम्हाला पाठवा…, आम्ही त्याला योग्य प्रसिद्धी देऊ. प्रभातच्या माध्यमातून सुरू झालेला जनसंवाद प्रशासन जागे होईपर्यंत सुरूच राहील…

धानोरी
धानोरी श्रमिकनगर भागात विद्युत तारांचे जाळे घरांच्या जवळून गेले आहे. या विद्युत तारा अनेक घराच्या छतावरुन गेल्या आहेत. काही वर्षापूर्वी तारा भूमिगत टाकण्यात आल्या; मात्र, त्याची जोडणी केलेली नाही. या वायर्समध्ये नेहमीच शॉर्ट सर्किट होत असते.
सिमा पांचाळ – 9921492545


विश्रांतवाडी घाट
नदी स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधीच्या निविदा काढल्या जातात. पण, नदी मात्र स्वच्छ झालेली नाही, याला जबाबदार कोण. हे छायाचित्र आहे मुळा नदीवरील विश्रांतवाडी घाटाचे.
राहुल भरत प्रताप – 9273333636


कात्रज-कोंढवा रस्ता
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली. सत्यस्थिती पाहता अजूनही वाहतूक कोंडी होत आहे हा प्रश्‍न गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, तो लवकरात लवकर मार्गी लावावा.
राजेंद्र भारस्कर – 7040946548


हांडेवाडी
हांडेवाडी रस्त्यावर मयूर वजन काट्याच्या मागे भंगार व्यापारी प्लॅस्टिक,रबरी वस्तू जाळतात त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. तक्रार करुन ही प्रशासन दखल घेत नाही.
माणिकराव सातव – 9762616161


निलायम टॉकीज
निलायम पुलापासून, सिंहगड रोडकडे वळताना चैतन्य हॉस्पिटल समोर अनेक दिवसांपासून बेवारस वाहने पडून आहेत. या वाहनांवर धूळ जमा होऊन स्थानिक नागरिक येथे कचरा टाकत आहेत.
अनिल अगावणे – 9822309973

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. प्रशांत गांधी says

    स्वारगेट कॉर्नर जवळ पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी चेंबर पाहिजे असे 6 महिन्यापासून मनपा प्रशासन कसबा विश्राम बाग प्रमुख यांना बरेचदा सांगितले आहे
    याठिकाणी पावसात मुख्य शिवाजी रस्ता व आतील लेनमधील प्रत्येक घरात पाणी साचून राहत आहे
    तीच अवस्था पुन्हा होऊ नये म्हणुन
    कृपया योग्य ती कारवाई करावी

Leave A Reply

Your email address will not be published.