मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत पोस्टमार्टम आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मॅनेजरसह या प्रकणातील संबंधित लोकांची चौकशी केली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी सुशांतच्या मॅनेजरसह गर्लफ्रेंड रियानेही हजेरी लावली आहे.
यातच अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अंतिम शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमार्टम अहवाल पोलिसांना मिळाला आहे. गळफास घेतल्यामुळे श्वास कोंडून मृत्यू झाल्याचं या अहवालात स्पष्ट झालं आहे. रासायनिक चाचणीसाठी त्याच्या आतडयांचे नमुने सुरक्षित ठेवण्यात येतील व न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात येतील. सुशांतच्या मृतदेहावर कोणतीच जखम नसल्याचीही माहिती डॉक्टरांनी दिली. सुशांतने आत्महत्या केल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे.
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत एकून जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये सुशांतचा चार्टर्ड अकाऊंटंट संजय श्रीधर याचाही समावेश आहे. सुशांतचे वडील, तीन बहिणी, त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी, मॅनेजर, स्वयंपाक आणि घरकाम करणारे, बिझनेस मॅनेजर, पीआर मॅनेजर, सुशांतच्या पहिल्या मालिकेते दिग्दर्शक, रिया चक्रवर्ती, मुकेश छाब्रा यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.
दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येमागे काय कारण होते हे अद्याप समजलेले नाही. मात्र, नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असा अंदाज आहे. तसेच सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्याचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते.