मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयची एक तुकडी मुंबईमध्ये दाखल झाली आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींच्या चौकशीसाठी सीबीआयने डीआरडीओचे अतिथीगृह निवडले असून येथेच आज सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची देखील चौकशी करण्यात येत आहे.
सुशांतच्या कथित आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांनीच त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप लावला आहे. अशातच आज रियाला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याने सीबीआय रियाला नेमके काय प्रश्न विचारणार याबाबत चर्चा सुरु आहे.
Mumbai: #RheaChakraborty arrives at DRDO guest house, where CBI team investigating #SushantSinghRajputDeathCase, is staying pic.twitter.com/yioaQdWj5b
— ANI (@ANI) August 28, 2020
एका इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने सुत्रांकरवी दिलेल्या वृत्तानुसार सीबीआय रियाला १० प्रमुख प्रश्न विचारू शकते.
१. सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल तिला कोणी माहिती दिली? माहिती मिळाली तेव्हा ती कुठे होती?
२. मृत्यूची बातमी समजताच ती वांद्रेच्या घरी गेली होती का? नसल्यास, का? तिने सुशांतचा मृतदेह सर्वप्रथम केव्हा आणि कोठे पहिला?
३. तिने ८ जून रोजी सुशांतसिंग राजपूतचे घर का सोडले?
४. घर सोडण्यापूर्वी दोघांमध्ये काही वाद झाले होते का?
५. सुशांतचे घर सोडल्यानंतर, तिचा सुशांतशी ९ ते १४ जूनदरम्यान काही संवाद झाला का? जर झाला तर काय बोलणं झालं आणि जर नाही तर संवाद न होण्याचं कारण काय?
६. त्या दिवसांमध्ये (९ ते १४ जून) सुशांतने तिच्याशी (रियाशी) संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? तिने सुशांतचे कॉल आणि मेसेजेस दुर्लक्षित केले का? जर हो तर कॉल, मेसेजेस दुर्लक्षित करण्याचं कारण काय?
७. सुशांतने तुझ्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? केला तर काय बोलणं झालं?
८. सुशांतवर सुरु असलेल्या वैद्यकीय उपचारांची माहिती. डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, आणि औषधोपचाराची माहिती.
९. रियाचे सुशांतच्या कुटुंबियांशी संबंध कसे होते?
१०. तिने सीबीआय चौकशीची मागणी का केली? तिला या प्रकरणाच्या तपासामध्ये काही चुकीचं घडतंय असं वाटत होत का?