वेलिंग्टन –ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान न मिळालेल्या सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडने आपल्या देशाकडून खेळण्याचा प्रस्ताव दिला आहे.
अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहून प्रभावित झालेल्या न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचा सदस्य तसेच माजी कसोटीपटू स्कॉट स्टायरीसने हा प्रस्ताव सूर्यकुमारला
दिला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यातील त्याची फलंदाजी पाहून आपण प्रचंड प्रभावित झालो असून इतकी प्रचंड गुणवत्ता असलेल्या खेळाडूला कसे डावलले जाते असा प्रश्न मला पडला. त्यामुळेच ही गुणवत्ता वाया जाऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळेच त्याने न्यूझीलंडकडून खेळण्याच्या प्रस्तावाचा विचार करावा, असे मत स्टायरीस यांनी व्यक्त केले आहे.
बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यातील सूर्यकुमारच्या नाबाद 79 धावांच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत यंदा प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने जर न्यूझीलंडकडून खेळण्यासाठी होकार दिला तर त्याच्या गुणवत्तेचे चीज होईल, असेही स्टायरीस म्हणाले.