वाघळवाडी: पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील नीरा नदी काठी पूरग्रस्त गावांची पाहणी करण्यात आली. दरम्यान, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, बारामतीचे तहसीलदार विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदाताई खराडे, मदन काकडे, निंबूत सरपंच राजकुमार बनसोडे, राजवर्धन शिंदे, शैलेंद्र रास्कर, माउली कदम, निलेश शिंदे उपसरपंच मुरूम तसेच निंबुत, मुरुम, सांगवी, लाटे या गावांमधील तलाठी ग्रामसेवक सरपंच-उपसरपंच तसे स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.