मुंबई – कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश यांच्यासोबत जे काही घडले ते भयावह आहे. रूट कॅनाल शस्त्रक्रियेनंतर स्वातीचा चेहरा सुजला आहे, स्वातीचे फोटो पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले आहे. स्वातीच्या चेहऱ्याची अवस्था पाहून चाहते नाराज झाले आहेत. स्वातीने इंडिया टुडेला दिलेल्या खास मुलाखतीत याबाबत सांगितले आहे.
या संपूर्ण घटनेचा संदर्भ देत स्वाती म्हणाली,’28 मे रोजी मी रूट कॅनाल उपचारासाठी गेले होते. माझे रूट कॅनॉल पूर्ण झाला नाही. माझ्या चेहऱ्यावर सूज आल्याने ती अपूर्णच राहिली आहे. जेव्हा स्वातीला विचारण्यात आले की या शस्त्रक्रियेदरम्यान तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? यावर प्रतिक्रिया देताना स्वाती म्हणाली,’मी दंतचिकित्सक नाही, त्यामुळे काय झाले यावर भाष्य करू शकत नाही. पण मी दुस-या मतासाठी त्यांचा सल्ला घेतल्यावर इतर दंतचिकित्सकांनी मला काय सांगितले ते मी निश्चितपणे सांगू शकते. पहिल्यांदा डॉक्टरांनी मला सोडियम हायपोक्लोराईटचे इंजेक्शन दिले. जेव्हा मला हे इंजेक्शन दिले गेले तेव्हा मी खरोखरच रडले होतो. मी मोठ्याने ओरडले. यानंतर भूल देण्याचे इंजेक्शन देण्यात आले.
पण दुसऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आधी भूल देण्याचे इंजेक्शन द्यायला हवे होते, नंतर सोडियम हायपोक्लोराईट असं म्हटले आहे. ते पुढे म्हणाले जेव्हा अभिनेत्री ओरडली तेव्हा डॉक्टरांनी सलाईनचे इंजेक्शन दिले असते तर एवढी सूज आली नसती. पण त्याने तसे केले नाही.
त्यांनी तिला चुकीचा सल्ला दिला. ते स्वातीला म्हणाले, हे दुखणं 2-3 दिवसात थांबेल असं आश्वासन तिच्या डॉक्टरांनी दिलं पणं असं काहीच न होता स्वातीचा चेहरा आणखी खराब होत गेला. 3 आठड्यानंतरही स्वातीच्या चेहऱ्याची सूज कमी झाली नाही. तिच्या चेहऱ्याची झालेली अवस्था पाहावेनाशी झाली आहे. तिला घरातून बाहेर पडणंही कठीण झालं आहे. आपल्याबाबत काहीतरी चुकीचं झालं असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिनं तात्काळ दुसऱ्या डॉक्टरांकडे धाव घेतली.’ असं ही त्यांनी सांगितले.
शस्त्रक्रियेनंतरच्या समस्यांचे वर्णन करताना स्वाती पुढे म्हणाली,’आता मी पूर्णपणे बरी होत आहे पण माझे ओठ योग्य आकारात येत नाहीत. मला नीट हसू येत नाही. 23 दिवस झाले पण तरीही माझ्या ओठ पूर्वी सारखे झाले नाही. डॉक्टरांच्या मते, बरे होण्यासाठी 2 आठवडे किंवा 1 महिना लागू शकतो. स्वाती पुढे म्हणाली,’मी या संपूर्ण प्रकरणावर माझ्या कुटुंबीयांशी चर्चा करेन, कारण मी कोर्टात गेले तर हे प्रकरण 2 वर्षे पुढे जाईल. मी त्याला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा विचार करत आहे.’
इंडिया टुडेशी बोलताना स्वातीची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःचा बचाव केला आहे. डॉक्टरांच्या मते, अभिनेत्रीचे आरोप पुराव्याशिवाय आहेत. अभिनेत्री वेळोवेळी तिची विधाने बदलत आहे. डॉक्टर पुढे म्हणाले – जे काही झाले ते रूट कॅनाल उपचारांच्या गुंतागुंतीमुळे होते. कोणत्याही वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नाही.
===============