नवी दिल्ली : आज जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जात आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस म्हणजेच आयटीबी जवानांनीही हजारो फूट उंचीवर योगा दिवस उत्साहात साजरा केला आहे. सिक्कीममध्ये आयटीबीपी जवानांनी 17 हजार फूट उंचीवर योगा केला. तर तिकडे उत्तराखंडमध्येही आयटीबी जवानांनी बर्फाच्छादित पर्वतावरही जवानांनी योग्य दिवस साजरा केला.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दलातील हिमवीरांनी आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने उत्तराखंडमध्ये 14 हजार 500 फूट उंचीवर योगा केला. आयटीबीपी जवानांनी उत्तराखंड हिमालयातील 22 हजार 850 फूट उंचीवर बर्फाच्या मध्यभागी योगासने केली. ITBP गिर्यारोहक गेल्या आठवड्यात माउंट अबी गामिनच्या शिखरावर होते, तिथे जवानांनी बर्फाच्छादित पर्वतांवर योगा केला.
Himveers of Indo-Tibetan Border Police (ITBP) perform Yoga in Ladakh at 17,000 feet, on the 8th #InternationalDayOfYoga pic.twitter.com/SpmFre6w1J
— ANI (@ANI) June 21, 2022
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, हिमवीर उत्तराखंडमध्ये 14,500 फूट उंचीवर योगासने करतात. याशिवाय आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अरुणाचल प्रदेश, सिक्कीमसह देशातील इतर अनेक भागात आयटीबीपीच्या जवानांनी हजारो फूट उंचीवर योगासने केली.
#WATCH | Himveers of Indo-Tibetan Border Police (ITBP) perform Yoga at an altitude of 14,500 feet in Uttarakhand, on the 8th #InternationalDayofYoga
(Source: ITBP) pic.twitter.com/OdYPrzpz09
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 21, 2022
इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांचे हिमवीर देशाच्या पूर्वेकडील एटीएस लोहितपूर येथे योगासने केली. सिक्कीममध्ये 17 हजार फूट उंचीवर सैनिकांनी योगा केला.