Supriya Sule : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी बोलताना अकोल्यातील एका घटनेचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत अकोल्यातील अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले.तसेच यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
अकोला येथील एका गुंडाने एका चौदा वर्षांच्या मुलीचे मुंडन करुन तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खदान पोलीसांनी त्या नराधमास अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार…
— Supriya Sule (@supriya_sule) November 20, 2023
याविषयी बोलताना,”अकोला येथील एका गुंडाने एका चौदा वर्षांच्या मुलीचे मुंडन करुन तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खदान पोलीसांनी त्या नराधमास अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत मजल जाते हे अतिशय संतापजनक आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे. या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून त्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी ” अशी मागणी केली.