Madhurani Prabhulkar : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. या मालिकेमुळे यातील कलाकरांना एक खास ओळख मिळाली आहे.
मालिकेत अरुंधतीची (Arundhati) भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) घराघरात पोहोचली आहे. या मालिकेमुळे मधुराणी प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर देखील तिचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
अश्यातच प्रेक्षकांच्या लाडक्या अरुंधतीने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोत अभिनेत्रीचा नेहमीपेक्षा काहीसा वेगळा लूक पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
मधुराणी प्रभुलकरने शेअर केलेल्या फोटोमध्ये नवीन हेअर कटमधील तिचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या फोटोला “न्यू हेअर कट स्माईल तो बनता है” असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या नव्या लूकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच पकड निर्माण केली आहे. त्यामुळेच मालिका टीआरपी रेसमध्ये सतत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असते. मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात आणि कुटुंबात सतत काही ना काही ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात.
सुरुवातीला साधीभोळी असणारी अरुंधती आता मालिकेत स्वतःच्या पायावर उभी झाली आहे. सध्या ती मोठ्या आत्मविश्वासाने प्रत्येक निर्णय घेत आहे. ती प्रत्येक संकटाला धाडसाने सामोरं जात आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.