नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या सोशल मीडिया विभाग प्रमुखपदी सुप्रिया श्रीनेत यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी त्या पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळत होत्या. त्यांची रोहन गुप्ता यांच्या जागी नियुक्ती झाली.
गुप्ता यांना आता प्रवक्ते करण्यात आले आहे. कॉंग्रेसने पक्ष संघटनेची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून पक्षाच्या कम्युनिकेशन्स शाखेतही फेरबदल करण्यात येत आहे. त्या शाखेचा प्रभार नुकताच माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्याकडे सोपवण्यात आला.
त्या शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या मीडिया विभागाची सुत्रे काही दिवसांपूर्वी पवन खेडा यांच्याकडे सोपवण्यात आली. सुप्रिया यांना प्रमुख करण्यात आलेला सोशल मीडिया विभागही कम्युनिकेशन्स शाखेचा भाग आहे.