नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची सोमवारी चौथ्यांदा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. त्यांना उद्या (मंगळवार) चौकशीसाठी पुन्हा बोलावण्यात आले आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी राहुल यांच्या चौकशीचे सत्र सुरू आहे.
त्यांची मागील आठवड्यात सलग तीन दिवस चौकशी झाली. त्यानंतर ते आज पुन्हा चौकशीसाठी ईडीच्या येथील मुख्यालयात दाखल झाले. त्यांची 4 दिवसांत मिळून जवळपास 40 तास चौकशी करण्यात आली.
राहुल यांच्या चौकशीचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसकडून देशभरात निदर्शने केली जात आहेत. राहुल यांच्या विरोधातील प्रकरण बनावट आणि निराधार आहे. त्यांची चौकशी राजकीय सूडबुद्धीतून केली जात आहे, असा कॉंग्रेसचा आरोप आहे.