नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी कारवाई केल्यानंतर कॉंग्रेस नेते पवन खेरा सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला होता. त्यांच्या या अंतरिम जामिनाची मुदत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी 3 मार्चपर्यंत वाढवली आहे.
सरन्यायाधिश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आसामचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या निवेदनाची दखल घेतली की, राज्य पोलिसांना त्याचा जबाब नोंदवायचा आहे.अतिरिक्त महाधिवक्ता गरिमा प्रसाद, उत्तर प्रदेशच्या बाजूने हेच निवेदन केले.
खंडपीठाने त्यांच्या सबमिशनची दखल घेतली आणि 3 मार्च रोजी खेरा यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे निश्चित केले आणि स्पष्ट केले की, 23 फेब्रुवारी रोजी त्यांना दिलेला अंतरिम जामीन तोपर्यंत लागू राहील.
Delhi excise policy case : सिसोदियांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी
17 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे पत्रकार परिषदेत मोदींविरोधात केलेल्या कथित वक्तव्याप्रकरणी खेरा यांना दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यानंतर येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.