Former Indian cricketer Sandeep Patil – एखाद्याने तुमच्यावर जबाबदारी सोपवली तर त्यासोबत सर्वांचा पाठिंबाही मोलाचा असतो. नुसती जबाबदारी देऊन भागत नाही. तर पाठिंबा दिला तर अपेक्षित निकालही मिळत असतात, असे मत भारताचे माजी क्रिकेपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केले.
निमित्त होते पीवायसी हिंदु जिमखाना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात वीर कारखानीस, अर्जुन सोनार, यश अधिकारी व अथर्व निमजे या उदयोन्मुख खेळाडूंना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडामहर्षी स्वर्गीय प्रो.डी.ब.देवधर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच, अमेय देशपांडे याला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या शिष्यवृत्ती प्रदान समारंभात पाटील बोलत होते.
पीवायसी हिंदु जिमखाना येथे पार पडलेल्या समारंभात पुरस्कारांचे वितरण भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, पीवायसी हिंदु जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव सारंग लागू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, अभिषेक ताम्हाणे, तन्मय आगाशे, शिरीष साठे, तुषार नगरकर, सिध्दार्थ भावे, ममता वैद्य, संयोगिता मोडक आदी उपस्थित होते. निरंजन गोडबोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
संदीप पाटील म्हणाले की, मी मध्यप्रदेश क्रिकेट संघाचा प्रशिक्षकही होतो आणि केनियाचे प्रशिक्षक पदही सांभाळले आहे. यावेळी जी जी मला जबाबदारी देण्यात आली, ती मी समर्थपणे सांभाळली. त्यावेळी त्या संघाकडून मला पूर्ण पाठिंबा मिळाला. निवड समितीचे अध्यक्षपद ही देखील मोठी जबाबदारी आहे. कारण तुम्हाला देशभरातून सर्वोत्तम खेळाडूंची निवड करायची असते. त्यावेळी मी विराट कोहली, रोहित शर्मा, अनिल कुंबळे या सर्वांशी संवाद साधला त्या सर्वांचा मला पाठिंबा मिळत गेला. त्यामुळेच देशासाठी आम्ही सर्वोत्तम संघ निवडू शकलो.
IPL 2024 (#MIvsSRH Match 8) : ट्रॅव्हिस हेडचा झेल सोडणं मुंबईला पडलं महागात; 18 चेंडूतच झळकावले….
मुंबई व भारतीय संघासाठी खेळण्याचे त्यांचे अनुभव कथन केले. यात त्यांनी १९८२ चा इंग्लंड दौरा व इंग्लंडच्या राजघराण्यासोबतची मुलाखत, १९८३ विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर पाटील ह्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, भारत व केनिया संघाचा प्रशिक्षक व निवडसमिती प्रमुख म्हणून केलेल्या कामाच्या आठवणींना देखील उजाळा दिला.