पुसेगाव – विसापूर येथे महोत्सव भव्य शाखा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. यावेळी तालुका प्रमुख दिनेश देवकर, क्षेत्र प्रमुख भानुदास कोरडे, विभाग प्रमुख मुगुटराव कदम, आमीन आगा, सुमित्रा शेडगे व पंचक्रोशीतील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील झालेली दुर्दशा, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना, विमानतळाचे दाखवलेले गाजर व लोकप्रतिनिधींची निष्क्रियता या विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात प्रताप जाधव यांनी तीव्र शब्दात टीका केली.
येणाऱ्या काही दिवसात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती जिहे कटापूर योजनेचे पाणी आपल्या भागात येणार असून आपल्या भागाचा कानाकोपरा ओलिताखाली येण्यासाठी सर्वांना प्रयत्नशील राहण्याची गरज असून या परिवर्तनाच्या लाटेत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे असे आवाहन जाधव यांनी केले. जिहे कटापूर पाणी या भागातील शेतीला मिळावे यासाठी कृष्णखोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील हे प्रयत्नशील आहेत. आपला भाग विकासापासून वंचित राहिला असून आपण सर्वांनी प्रयत्नशील व एकजूट रहण्याची गरज आहे.
यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते. शाखा प्रमुखपदी सचिन गुजर, उपशाखा गणेश वायदंडे, मार्गदर्शक आनंदराव सावंत, तुषार सावंत, मावळा प्रतिष्ठानचे योगेश सावंत याची निवड करण्यात आली.