वाघोली (प्रतिनिधी) – जनता केंद्रबिंदू मानून जनसेवकाने केलेल्या कामाचे खरे पाठबळ म्हणजे दिला जाणारा पुरस्कार. समाजाकडून मिळालेली पुरस्कार ही काम करण्याची नवी प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र सातव पाटील यांनी केले.
आव्हाळवाडी तालुका येथील लोकनियुक्त सरपंच ललिता चंद्रकांत आव्हाळे यांना पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल आव्हाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुणे जिल्हा पदाधिकारी व प्रशासकीय प्रमुखांच्या हस्ते आव्हाळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. वाघोली ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील, वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच चंद्रकांत आव्हाळे यांच्या हस्ते निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.