पुणे, मुंबई शहरात आजारी रुग्णांना ज्या प्रकारे सुविधा मिळतात त्याप्रमाणे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्याच्या चांगल्या आधुनिक सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी डॉ. आशिष चव्हाण यांनी आधुनिक पद्धतीचे सुसज्ज असे आधार हॉस्पिटल पारगाव (ता.आंबेगाव) येथे उभाराले. आता हेच हॉस्पिटल गरिबांना आधार देणारे हॉस्पिटल म्हणून ओळखले जात आहे.
आंबेगाव व जुन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या मंगळुर पारगाव (ता. जुन्नर) येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले डॉ. आशिष चव्हाण यांनी उच्चशिक्षण घेऊन डॉक्टरकीची पदवी संपादन केल्यानंतर आपण ज्या भागात जन्मलो त्या भागातील सर्वसामान्य जनतेला कोणत्याही आजारावरील उपचारासाठी पुणे मुबंई शहरात जावे लागु नये त्यांची पैशाची व वेळेची बचत व्हावी त्यांच्या आजाराचे योग्य निदान व उपचार व्हावे यासाठी व आपण ज्या समाजात वाढलो त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेतुन आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पारगाव (शिंगवे) येथे डॉ. आशिष चव्हाण (बीएएमएस, एमबीबीएस) व डॉ. स्मिता चव्हाण (बीएएमएसया दांपत्याने मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलप्रमाणे सर्वप्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या आधार हॉस्पीटलची 2003 साली मुहुर्तमेढ रोवली आज त्या हॉस्पिटलचे एका वटवृक्षात रुपांतर झाले आहे. येथे सर्व आजाराचे निदान व उपचार आणि सर्व प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया पुणे मुबंई शहरातील मोठ्या हॉस्पिटलप्रमाणे ग्रामीण भागात सुध्दा अगदी माफक दरामध्ये केल्या जातात. पुणे, मुंबई व अन्य शहरातील रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरुर, पारनेर आदी तालुक्यातील अनेक गरिब कुटुंबातील रुग्णांना आजारातून पूर्णपणे मुक्त झाल्यानंतर डॉ. आशिष चव्हाण हे आधार हॉस्पिटलच्या रुपाने एक प्रकारे देवदूत भेटला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांकडे पैसे असो अथवा नसो तरीही गोरगरीब ऊसतोड मजुर, आदिवासी कुटुंबातील व्यक्तींवर योग्य उपचार करुन डॉ. चव्हाण सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. डॉ. चव्हाण यांनी आंबेगाव तालुका मेडीकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मोफत आरोग्य शिबिरासारखे सामाजिक उपक्रमही राबविले आहेत.
उपलब्ध सुविधा
- जनरल हॉस्पिटल
- प्रसुतीगृह
- सुसज्ज ऑपरेशन थिएटर
- डिजिटल एक्सरे
- अत्याधुनिक अतिदक्षता विभाग
- फिजीओथेरिपी
- 24 तास मेडिकल स्टोअर्स
- सुसज्ज रुग्णवाहिका
- कॅशलेस इन्सुरन्स सुविधा
- ए.सी. डिलक्स रुम
- पॅथालॉजी लॅबोरेटरी
प्रभातच्या 89 व्या वर्धापन दिनानिमित्त व नवीन वर्षाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा
संकलन: लक्ष्मण ढोबळे
पारगाव शिंगवे