बारामती : मेंढपाळ मारहाणप्रकरणी कठोर कारवाई करा

सुपे दूरक्षेत्रात तणाव : रासप पदाधिकाऱ्यांची मागणी

Madhuvan

सोमेश्‍वरनगर(प्रतिनिधी) – सोनपिरवाडी (ता. बारामती) हद्दीत उंडवडी सुपे रोडवर पुरंदर तालुक्‍यातील मेंढपाळांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून सरकारने नवीन कायदा करावा, अशी मागणी रासपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. ही घटना बुधवारी (दि.23, सप्टेंबर) घडली आहे. 

रासपचे तालुकाध्यक्ष अॅड. अमोल सातकर यांच्या नेतृत्वाखालील सुपे दूरक्षेत्र जात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. यावेळी वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली.

यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक बापुराव सोलनकर, माणिक काळे, संपत टकले, कल्याणी वाघमोडे, पदाधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.