धनगर समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन
बारामती- धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे व आदिवासींना ज्या सवलती लागू आहेत. त्या सवलती धनगर समाजाला लागू करून त्वरित एक हजार कोटी रुपयांचा निधी त्वरित वर्ग करावा, या मागण्यांसाठी शुक्रवार (दि.25) बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन केले. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांच्यासह गोविंद देवकाते, भारत देवकाते, सुधाकर पांढरे, अजित मासाळ, अनिल मासाळ, समीर झारगड, अविनाश मासाळ, जगदीश कोळेकर, गणेश कोकरे, दिलीप गरदाडे, नितीन शेळके, संदीप केसकर, हनुमंत देवकाते, सुधीर देवकाते, बापू भिसे, स्वप्नील घुले, तुषार खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी. फडणवीस सरकारने धनगर समाजाच्या उन्नतीसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी.तसेच राज्यात मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी कायदा होणे गरजेचे आहे. धनगर समाजाच्या मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल.
– पांडुरंग कचरे, तालुकाध्यक्ष, भाजप, बारामती.