Suniel Shetty – अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टी सध्या चर्चेत आहे. अहानचे 11 वर्षे जुने नाते तुटल्याची चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत ब्रेकअप केले आहे.
या जोडप्याचे ब्रेकअप होऊन दीड महिना झाला आहे. दोघेही 11 वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. अहान आणि तानिया लहानपणापासून एकत्र शिकले आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. पण आता हे जोडपे वेगळे झाल्याचे बोलले जात आहे.
मात्र, त्यांच्या ब्रेकअपचे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याचबरोबर अहान आणि तानियाकडूनही या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण दोघांनीही बऱ्याच दिवसांपासून एकही पोस्ट शेअर केलेली नाही
तानिया श्रॉफ प्रसिद्ध मॉडेल आणि उद्योगपती जादेव आणि रोमिला श्रॉफ यांची मुलगी आहे. ती नामांकित उद्योगपतींच्या कुटुंबातील आहे. अहानबद्दल बोलायचे झाले तर, त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तो तारा सुतारियासोबत ‘तडप’ चित्रपटात दिसला होता.
तानिया श्रॉफ अनेकवेळा सुनील शेट्टीच्या कुटुंबासोबत दिसली आहे. ‘तडप’च्या स्क्रिनिंगदरम्यानही ती दिसली होती. सुनील शेट्टीनेही तानियाचा अनेकदा उल्लेख केला आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो तानियाला आपल्या मुलीप्रमाणे मानतो.