Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार ही लढत जवळपास निश्चित मानली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच उमेदवार असल्याचे निश्चित झाल्याचे दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांचे बारामती मतदार संघात प्रचंड दौरे वाढल्याचे दिसून येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामतीतील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन होत आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.आज त्यांच्या उपस्थितीत बिरजू मांढरे मित्र परिवाराच्या वतीने सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी होम मिनिस्टर व हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी सुनेत्रा पवार यांचे तब्बल 125 किलोचा भला मोठा हार क्रेनच्या साह्याने घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले..