मंचर -येथे सिद्धेश थोरात (वय 24) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. 2) रात्री घडली. याबाबत तरुणाचे वडील सुनील बाजीराव थोरात यांनी मंचर पोलिसांत फिर्याद दिली आहे. आत्महत्येचे कारण समजलेले नाही.
मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, या घटनेचा पुढील तपास मंचरचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान गणेश डावखर करीत आहे.